शाश्वत शेती |
आजच्या काळात शेतीसमोर वाढत्या लोकसंख्येला विषमुक्त अन्नपुरवठा करणे आणि हवामान बदलासारख्या आव्हानांना तोंड देणे ही दोन मोठी जागतिक आव्हाने आज शेती समोर आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी, आपल्याला अश्या कृषी पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे ज्या पर्यावरण- दृष्ट्या टिकाऊ, सामाजिक दृष्ट्या न्यायी, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि मानवी आरोग्यासाठी सुरक्षित असतील. शाश्वत शेती ही एक अशीच संकल्पना आहे जी या सर्व निकषांना पूर्ण करते.
या लेखात आपण शाश्वत शेतीच्या खालील मुद्यांच विचार करणार आहोत -
- शाश्वत शेती म्हणजे काय ?
- शाश्वत शेतीचे प्रकार
- भारतात शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या योजना राबवल्या जात आहेत ?
- शाश्वत शेतीसमोरील आव्हाने आणि संधी
- शाश्वत शेती स्वीकारण्यासाठी काय
1. शाश्वत शेती म्हणजे काय ?
शाश्वत शेती ही एक अशी शेती पध्दती आहे जी पर्यावरण, मानवी आरोग्य, अर्थव्यवस्था, समाज, यांच्या गरजा पूर्ण करते आणि त्याबरोबर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत करते.
शाश्वत शेतीमधील काही मुख्य मुद्दे -
शाश्वत शेती ही एक अशी कृषी पध्दती आहे जी पर्यावरण, सामाजिक, आणि आर्थिक दृष्ट्या टिकावू आहे. याचा अर्थ असा की ती जमिनीची सुपीकता टिकवून ठेवते, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करते, शेतकऱ्यांना योग्य उत्पन्न देते आणि भविष्यातील पिढ्यांसाठी विषमुक्त अन्न पुरवठा करण्यासाठी मदत करते.
पर्यावरणीय दृष्ट्या टिकाऊ - रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे, सेंद्रीय खतांचा वापर करणे, जैविक कीटक नियंत्रण पद्धतींचा अवलंब करणे, मातीची धूप थांबवणे, पाण्याचा वापर गरजे पुरता करणे, जैवविविधता टिकवून ठेवणे.
सामाजिक दृष्ट्या उपयोगी - शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती मालाला योग्य दर मिळतो, ग्रामीण भागातील तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, लहान व अल्प भुधारक शेतकरी सक्षम होतात.
आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य - शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थिरता प्रदान करणे, उत्पादन खर्च कमी करणे, बाजारपेठेतील मूल्यात वाढ करणे, मूल्यवर्धित शेती उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणे.
2. शाश्वत शेतीचे प्रकार -
शाश्वत शेती ही एक व्यापक संकल्पना आहे ज्यामध्ये शेतीच्या अनेक प्रकारांचा आणि पद्धतींचा अवलंब केला गेला आहे. हे सर्व पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या टिकाऊ कृषी पद्धतींचा अवलंब करतात.
1. सेंद्रिय शेती - रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर पूर्णपणे टाळणे, जैविक किटक-नियंत्रण पध्दतींचा वापर करणे, गांडूळ खत, शेणखत, लेंडी खत या प्रकारच्या खतांचा वापर करणे, पिकांची विविधता आणि पीक फेरपालट पद्धतींचा अवलंब करणे.
2. जैविक शेती पध्दतींचा अवलंब करणे - जीवाश्म इंधनावर अवलंबून न राहता नैसर्गिक प्रक्रियांद्वारे उत्पादन वाढवणे, सेंद्रीय खते आणि जैविक कीटकनाशकांचा वापर, पीक आणि पशुधन यांच्यातील एकात्मता, ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर.
3. संरक्षित शेती - पावसाच्या पाण्यापासून होणारी मातीची धूप रोखण्यासाठी उपाययोजना करणे, मल्चिंग, कव्हर क्रॉप्स, आणि शून्य मशागत पध्दतींचा वापर, वाऱ्यापासून पिकांचे संरक्षण करणे, मातीतील ओलावा टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या अच्छादनांचा वापर करणे.
4. कृषी वनीकरण - फळझाडे आणि पिके एकत्रित लावणे, झाडांमुळे मिळणारी सावली आणि पोषकद्रव्ये पिकांसाठी फायदेशीर ठरतात, मातीची धूप आणि क्षारपणा टाळण्यास मदत होते आणि जैवविविधता वाढते.
5. जलसंवर्धन - पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करणे जसे की ठिबक सिंचन, तुषार सिंचन चा वापर करणे, विहीर आणि कुपनलिकांचे पुनर्भरण करणे, शेततळ्याची बांधणी करणे, पाण्याचा ताण सहन करू शकणाऱ्या आणि लवकर पक्व होणाऱ्या जातींची निवड आणि लागवड करावी.
शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करताना अनेक घटकांचा विचार करणे आवश्यक आहे, जसे की :
- संबंधित विभागातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती.
- उपलब्ध संसाधने
- सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती.
- बाजारपेठेतील मागणी.
3. शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या काही प्रमुख सरकारी योजना -
- राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY)
- परंपरागत कृषी विकास योजना (PKVY)
- सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान योजना (Micro Irrigation Scheme)
- राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान (NMSA)
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY)
- राष्ट्रीय फळबाग योजना (NHM)
- मृदा आरोग्य कार्ड (Soil Health Card)
4. शाश्वत शेतीसमोरील आव्हाने -
- ज्ञान आणि जागरुकतेचा आभाव
- आर्थिक अडचणी
- तंत्रज्ञानाची कमतरता
- बाजारपेठेतील मागणीचा अभाव
- सरकारी धोरणांच्या अंमलबजावणीचा अभाव
5. शाश्वत शेतीतील संधी -
- सेंद्रिय शेतमालाची वाढती मागणी
- सरकारी योजनांचे पाठबळ
- तंत्रज्ञानातील प्रगती
- जैवविविधता
- Climate smart agriculture
6. शाश्वत शेतीचे अनेक फायदे आहेत ज्यात खलील गोष्टींचा समावेश होतो -
- पर्यावरणीय फायदे
- सामाजिक आणि आर्थिक फायदे
- शेतकऱ्यांना हवामान बदलास जुळवून घेण्यास मदत होते.
- सेंद्रिय उत्पादकता वाढते
- दीर्घकालीन आर्थिक विकासाला चालना मिळते.
शाश्वत शेती ही केवळ एक पर्याय नाही तर सध्याच्या काळाची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येला विषमुक्त अन्न पुरवठा करण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी आपल्याला भविष्यात याच पद्धतींचा अवलंब करावा लागेल. शाश्वत शेतीचा अवलंब करून आपण एक अधिक टिकाऊ आणि समृद्ध भविष्य निर्माण करू शकतो यात किंचित ही शंका नाही.
0 Comments
या वेबसाइटवरील मत हे वैयक्तिक असून यातून कोणाच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला गेला नाही.
या वेबसाइटवरील महितीची सत्यता दुसरीकडून पडताळून पहावी.