PM Kisan |
PM Kisan योजना सरकार बंद करणार ?
केंद्र सरकार pm kisan योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन टप्प्यात ६००० रुपये देते. पण लोकसभा निवडणुकी नंतर या योजनेत बदल होतील किंवा योजनाच बंद करण्यात येईल अश्या चर्चना उधाण आले आहे. PM Kisan या योजनेतून शेतकऱ्यांच्या मनात मोदी सरकार म्हणजे शेतकरी हिताचे सरकार अशी प्रतिमा तयार करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो.
शेतकऱ्यांच्या मुद्दा आला की, सत्ताधारी आमदार, खासदार, मंत्री सर्वजण या योजनेचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाहीत. पण आता ही योजना बंद करण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली आहे.
PM Kisan बंद होण्याची चर्चा का ?
PM Kisan योजना सरकार बंद करणार ही चर्चा सुरू होण्याचे कारण म्हणजे नीती आयोग आहे. नीती आयोगाने देशातील pm kisan योजनेस पात्र शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय नीती आयोग या योजनेचा शेतकऱ्यांना कितपत फायदा झाला हे तपासत आहे. खालील गोष्टींच्या आधारे नीती आयोग pm kisan योजनेचे सर्वेक्षण करणार आहे.
१). या योजनेची उदिष्ट पूर्ण केले की नाही.
२). या योजनेचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला.
३). या योजनेत लाभ देताना काही गडबडी झाली का ?
४). या योजनेचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचला की नाही.
या सर्व गोष्टी नीती आयोग तपासणार आहे.
या सर्वेक्षणातून काही सल्ला आणि सूचना देण्यात येतील आणि ही योजना बंद होणार की नाही हे स्पष्ट नसले तरी या योजनेत काही प्रमाणात बदल होतील हे नक्की.
0 Comments
या वेबसाइटवरील मत हे वैयक्तिक असून यातून कोणाच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला गेला नाही.
या वेबसाइटवरील महितीची सत्यता दुसरीकडून पडताळून पहावी.