Why Quit Social Media ? |
समाज माध्यमांचा विळखा आणि आपण
आजच्या जगात, समाज माध्यमांनी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर प्रभाव टाकला आहे, मग ते २ वर्षांचे मूल असो किंवा ६० वर्षांचा वृद्ध व्यक्ती. हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. ज्याशिवाय लोक आपला दिवस घालवू शकत नाही. एखादे मूल रडत असले तरी, रडणे थांबवण्यासाठी कोणीतरी त्यांना मजेदार व्हिडिओ मोबाईल वर लावून देतो. मग, समाज माध्यम म्हणजे काय ? हे विविध तंत्रज्ञानाचे मिश्रण आहे जे जगभरातील लोकांना माहिती, कल्पना आणि निर्मिती सामायिक करण्यात मदत करते. पण मग प्रश्न पडतो की त्याचे अनेक फायदे असले तरी ते लोकांच्या आरोग्यासाठी चांगले आहे का ? आणि त्याचे व्यसन लोकांना कसे लागत आहे ? हे आपण या लेखातून पाहणार आहोत.
लोकांना मोबाईल स्क्रीनशी खिळवून ठेवण्यासाठी अनेक मोठ मोठ्या समाज माध्यम कंपन्या लक्ष अभियंता (Attension Engineers) नावाच्या व्यक्तींना नियुक्त करतात जे जुगारातील तत्वांचा अधार घेऊन ही समाज माध्यमे शक्य तितकी व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न करतात, या समाज माध्यमांचा वापर करण्यासाठी ते अश्या पद्धतीने बनवले जातात की तुम्ही ते व्यसनाधीन मार्गाने वापर करता आणि ते तुमचे पूर्ण लक्ष वेधून घेते यातूनच ते तुमचा डेटा मिळवतात आणि त्यातून नफा कमावतात.
लोकांचे लक्ष हे संकेतस्थळावरील बातमीवर वेधून घेण्यासाठी संकेतस्थळे अधिकाधिक कार्यक्षम आणि आकर्षक बनवली गेली आहेत. जेणेकरून लोकांनी जास्तीत जास्त वेळ त्या ठराविक संकेतस्थळावर किंवा समाज माध्यमांवर खर्च करावा आणि त्यातून या कंपन्या संकेतस्थळावरील अनावश्यक जाहिरातींमधून आर्थिक फायदा कमावतात. तुम्हाला ते कळत नाही पण तुम्हाला समाज माध्यमाची साधने व्यसनाधीन करण्यासाठी तयार केली जात आहेत. या साधनांची वास्तविक रचना हेतू असा आहे की ही साधने तुम्ही तुमच्या जागृत आणि कामच्या वेळेत तुमची एकाग्रता विचलित करतात आणि तुम्हाला त्याचा वापर करण्यासाठी प्रवृत्त केले जाते, यामुळे माणसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.
समोर आलेल्या संशोधनानुसार असे समजते की जर तुम्ही तुमच्या दिवसाचा मोठा भाग मोबाईल वर आलेल्या नोटीफीकेशन तपासण्यासाठी झटपट एक नजर टाकण्यासाठी तुम्ही तुमचे काम किंवा अभ्यास बाजूला ठेवून व्हाट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर एक्स, युट्यूब, थ्रेड, फेसबुक हे वापरत असाल तर यामुळे तुमचे लक्ष विचलित होते, आणि तुमची एका ठिकाणी जास्त वेळ लक्ष देण्याची क्षमता, एकाग्रता कायमची कमी होऊ शकते. जेव्हा आपण या तंत्रज्ञानात सर्वात जास्त संतृप्त असलेल्या तरुण पिढीकडे पाहतो तेव्हा याची काळजी करण्याची गरज वाटते, परंतु आताच्या काळात फक्त तरुणच नाही तर लहान बालके, मुले, आणि वृद्ध व्यक्ती सुद्धा या तंत्रज्ञानात आकंठ बुडालेले आपल्याला आढळून येतील. जर आपण मोबाईल बाजूला ठेवून सभोवताली पाहिले तर हे भयानक दृश्य आपल्याला ही दिसेल ?
Quit Social Media
समाज माध्यमं ही तंत्रज्ञानापेक्षा “मानसशास्त्र” आणि “समाजशास्त्राबद्दल” अधिक आहेत कारण ती आपल्या मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर विपरीत परिणाम करत आहेत. लोक स्वतःमध्ये सर्वोत्तम शोधण्याऐवजी ते स्वतःची तुलना काहीशा बनावट जीवनाशी करतात. जे इतर लोक सोशल मीडियावर प्रदर्शित करतात. सध्याच्या काळात तरुण पिढीमध्ये “सेल्फायटीस” नावाच्या एका मानसिक अस्वास्थ्याच्या लक्षणाचा खूप प्रसार झाला आहे, यालाच सेल्फी सिंड्रोम असेही म्हटले जाते. आजच्या तरुण पिढीला प्रत्येक गोष्ट समाज माध्यमांवर टाकण्याचे व्यसन लागले आहे. मग ते खासगी आयुष्यातील क्षण सुध्दा काहीजण समाज माध्यमांवर टाकून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात, किंवा एखादी वाईट गोष्ट त्यांच्याबरोबर घडली तर ते त्यातून सहानुभूती मिळवण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करतात. यातूनच अनेक लोकांना त्यांचं खासगी आयुष्य हे समाज माध्यमांवर जगण्याची सवय लागली आहे. Quit Social Media
इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याची आम्हाला खरोखर काळजी आहे, उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर स्वतःचा एक नवीन प्रोफाइल फोटो अपलोड करता तेव्हा तुम्हाला इतर लोक काय म्हणतात हे जाणून घेण्यास तुम्ही आतुर झालेले असता. लोक तुमच्या नवीन प्रोफाइल फोटोबद्दल काय विचार करतात हे तुम्हाला जाणून घ्यायचे असते. जर तुमच्या फोटोवर कोणी नकारात्मक मत मांडले तर तुम्ही निराश होता, आणि जेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रोफाइल फोटोला नवीन पसंती मिळतात तेंव्हा तुम्ही आनंदित होता म्हणजे तुमचा फोटो चांगला आहे की वाईट आहे हे ठरवण्याचा अधिकार तुम्ही समोरच्या अनोळख्या व्यक्तीला देता यातूनच बरयाच वेळा काही लोकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होते आणि ते स्वतःच्या दिसण्याचा द्वेष करू लागतात. काही जन समाज माध्यमावर सुंदर दिसण्यासाठी मेकअप, आणि वेगवेगळ्या फिल्टर्सचा वापर करतात. यातून स्वतःची खरी ओळख लपवून एक आभासी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. 'समाज माध्यमांचा विळखा आणि आपण'
Quit Social Media |
समाज माध्यमांमुळे लोकांच्या शारीरिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे कारण ते त्यांच्या मोबाईल वर बराच वेळ बसतात ज्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल मर्यादित होते. स्क्रीनच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने डोळ्यांना होणारे नुकसान देखील वाढते. एकाच परिवारातील लोकांचा संवाद कसा कमी झाला आहे हे सांगायला नको. जसे आपल्याला माहित आहे की मानव हा सामाजिक प्राणी आहे त्यांने एकमेकांशी संवाद साधला पाहिजे कारण जर त्यांने तसे केले नाही तर यामुळे विविध मानसिक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
समाज माध्यमं विनामूल्य आहेत कारण तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ त्यासाठी खर्च करता. शेवटच्या मुद्द्यावर, मी असे म्हणू इच्छितो की मी असे सुचवत नाही की आपण समाज माध्यमांचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे, त्याऐवजी आपण त्याचा वापर काही प्रमाणात मर्यादित केला पाहिजे आणि निरोगी भविष्यासाठी आपल्या उद्दिष्टांना प्राधान्य दिले पाहिजे कारण तुम्ही एखद्या वस्तूसाठी किंमत मोजत नसाल तर खात्री करा कि तुम्हाला कोणी त्यांच्या फायद्याची वस्तू तर बनवलं नाही ना.
0 Comments
या वेबसाइटवरील मत हे वैयक्तिक असून यातून कोणाच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला गेला नाही.
या वेबसाइटवरील महितीची सत्यता दुसरीकडून पडताळून पहावी.