कोरडवाहू अर्थसंकल्प २०२५ iStock Credit: paresh3d कृषी क्षेत्राला विकासाचे पहिले इंजिन म्हणत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी म्हणजेच १ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रधानमंत्री धनधान्य योजना आणि इतर योजनांची घोषणा केली. ज्या १०० जिल्ह्यांमध्ये कमी उत्पादन आहे अश्या जिल्ह्यांतील १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असे म्हटले गेले. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले कि अर्थसंकल्पामुळे शेती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासला मदत होईल मात्र प्रत्यक्षात या विकासाच्या इंजिनला निधीची उर्जा मिळालीच नाही. शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या व खतांच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता या अर्थसंकल्पावरून आपल्या स्पष्ट होताना दिसते आहे. अर्थसंकल्पातील शेतकरी हिताच्या महत्वाच्या १० योजना शेतकऱ्यांसाठी किती फायद्याच्या होतात का नेहमी प्रमाणे या योजनाही पालापाचोळ्या सारख्या हवेत उडून जातात हे पाहण्यासारखे ठरेल. वाढत्या महागाईबरोबर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ही गगनाला भिडत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या उत्पन्न हे मातीमोल ठरत आहे त्याच्या मालाला चांगला भाव भेटत नाही. निर्यात धोरणाचा अभाव...
खेडी समृद्ध झाली का ? खेडी समृद्ध झाली का खरा भारत गावागावात खेड्यापाड्यात वसला आहे, हे जाणून गांधीजीनी खेड्याकडे चला अशी हाक दिली. त्यांनी खेड्याकडे चला असे आवाहन करून खेड्यांना देशाच्या विकासाचे केंद्र बनवण्याचे स्वप्न पहिले होते. गांधीजींच्या मते, खेडे हे भारताचे डोके आहे. खेड्यांचा विकास करूनच देशाचा सर्वांगीण विकस होऊ शकतो. स्वदेशी, खादी आणि ग्रामोद्योग या संकल्पनांवर भर देऊन खेड्यांमध्ये उद्योगधंदे सुरु करून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे हा त्यांच्या घोषणे मागील उद्देश होता. आज इतक्या वर्षानंतरही आपण गांधीजींच्या स्वप्नातील खेडी साकारण्यात यशस्वी झालो आहे का आणि आपल्या मनात हा प्रश्न किती वेळा पडतो याचा विचार तरी मनात कधी येतो का ? ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. फक्त घोषणा देऊन आणि संसद आदर्श ग्राम योजना जाहीर करून खेडी समृद्ध होणार आहेत का ? या लेखात आपण खेड्यातील शेतीसमोरील आणि तरुणांसामोरील आव्हाह्नांचा उहापोह करणार आहोत. १) शेतीसामोरील आव्हाने भारत ...